थोडक्यात
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन
वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन
(Shivajirao Kardile) आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले आहे.
शिवाजी कर्डिले यांनी सरपंच म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात केली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांचं असे अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.