Sidramppa Patil Passed Away 
महाराष्ट्र

Sidramppa Patil Passed Away : अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचं निधन

अक्कलकोट येथील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अक्कलकोट मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Sidramppa Patil Passed Away ) अक्कलकोट येथील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अक्कलकोट मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सिद्रामप्पा पाटील यांची ओळख अक्कलकोट तालुक्यातील प्रभावी, अनुभवी आणि सर्वसमावेशक नेतृत्व अशी होती.

त्यांच्या चार दशकांहून अधिक काळातील सार्वजनिक जीवनात सहकार, कृषी, ग्रामीण विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. गावच्या सरपंचपदापासून त्यांनी कार्याची सुरुवात केली आणि पुढे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक व उपाध्यक्ष, तसेच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.

नंतर ते अक्कलकोटचे आमदार म्हणून निवडून आले आणि भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून मान्यता मिळवली.त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक लोकप्रतिनिधी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या मूळ गावी कुमठे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने अक्कलकोटच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

Summery

  • अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचं निधन

  • वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा