महाराष्ट्र

सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल – Sharad Pawar

Published by : Lokshahi News

अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झालं आहे. गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर अनेक स्तरातील मान्यवर मंडळींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभे केलेले सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे म्हणत शरद पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ, मराठवाडा जिल्हाप्रमुखांची बैठक…

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार