महाराष्ट्र

विजय मल्ल्याच्या ‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव

Published by : Lokshahi News

फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुंबईतील सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस लिलावात विकले गेले आहे. हे घर हैदराबादस्थित सॅटर्न रियल्टर्सने ५२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. ही किंमत या घराच्या राखीव किंमत १३५ कोटींपेक्षा एक तृतीयांश आहे.

२०१९ मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील किंगफिशर हाऊसचा आठव्यांदा लिलाव केला होता. मात्र त्याला कोणीच घेतलं नाही त्याची ओरिजनल किंमत १५० कोटी होती. डेट रिकव्हरी टर्ब्युनलकडून त्या घराचा लिलाव करण्यात आला होता.

या लिलावातून जे पैसे येणार होते, ते गुंतवणुकदारांना मिळणार होते. आतापर्यंत माल्याची प्रॉपर्टी विकून ७५२० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत दरम्यान, बँकांच्या एका संघाचे माल्याकडे एकूण १० हजार कोटी रुपये थकीत आहेत. या संघाची प्रमुख बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. लंडन हायकोर्टाने जुलै महिन्यात दिवाळखोर घोषित केलं होतं.

भारतातील बँका त्याच्या संपत्तीवर कब्जा करू शकतात, तसेच त्या विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. किंगफिशर एअरलाईन्स कर्ज प्रकरणात ईडी आणि सीबीआय चौकशी करत असताना विजय मल्ल्या देशातून फरार झाला होता मल्ल्याने भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविले आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक