थोडक्यात
पुण्यात मुसळधार पाऊस
थेऊरमधील 50 घरामध्ये शिरलं पाणी
अनेक घरे पाण्याखाली
(Pune ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
याच जोरदार पावसामुळे थेऊरमधील 50 घरामध्ये पाणी शिरलं असून घटनास्थळावर एनडीआरएफची टीम दाखल झाली असून अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. थेऊर सह धायरी आणि इंदापूर मध्येही मोठ्या प्रमाणात अनेक घरात पाणी शिरलं आहे.