थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Weather Update) राज्यात थंडीची चाहूल लागली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा घसरलेला आहे.
यातच आता मुंबईत आजपासून पुन्हा गारठा जाणवणार आहे. मुंबईचे किमान तापमान १७ तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिसपर्यंत राहणार असून उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह उत्तर कोकणाचा पारा १५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंबईत पुन्हा गारठा
उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात
तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता