थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Voters list) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुका तोंडावर असताना याद्यांच्या घोळ अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरात मतदारयाद्यांमधील घोळ कायम असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई पालिकेच्या मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे पाहायला मिळत असून साडेतीन हजारांहून अधिक सूचना, हरकती प्राप्त झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. आजपासून मुंबई पालिका याद्यांची पडताळणी करणार असून पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन ही पडताळणी करणार आहे.
यासाठी 3 डिसेंबर ही अंतिम तारीख असणार आहे. मतदार याद्यातील दुबार नाव, प्रिंटिंग मिस्टेक अशा यादीतील विविध समस्या सोडवण्यासाठी आजपासून पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन याद्यांच्या पडताळणी करणार आहे.
Summery
मुंबई पालिकेच्या मतदारयाद्यांमध्ये घोळ
साडेतीन हजारांहून अधिक सूचना, हरकती प्राप्त
आजपासून मुंबई पालिका करणार याद्यांची पडताळणी