थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BKC Bullet Train) बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायुप्रदूषणप्रकरणी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अन् हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांना 'कारणे दाखवा'नोटीस बजावली असून तीन दिवसांत उत्तर मागितले असल्याची माहिती मिळत आहे.
कंपन्यांनी तीन दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा दिला आहे. वायुप्रदूषण नियंत्रण पथकाने जी ब्लॉकमधील बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाच्या प्रकल्पस्थळाची पाहणी केली होती त्यावेळी वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे आढळले होते. प्रदूषण कमी करण्यात बांधकाम कंपन्या अपयशी ठरल्याचे पालिकेच्या नोटिसीत म्हटले आहे. यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. पालिकेच्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारी आणि खासगी प्रकल्पांचे कंत्राटदार यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा देण्यात आला असून तीन दिवसांत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्पाचे काम थांबविले जाईल, असे सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने ९५ हून अधिक पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक उभारणीवेळी वायुप्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कंत्राटदार कंपन्यांना मुंबई महापालिकेच्या एच ईस्ट वॉर्डने ही नोटीस बजावली आहे.
Summery
बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती देणार... ?
वायुप्रदूषणप्रकरणी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अन् हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांना 'कारणे दाखवा', तीन दिवसांत उत्तर मागितले
बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक उभारणीवेळी वायुप्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कंत्राटदार कंपन्यांना मुंबई महापालिकेच्या एच ईस्ट वॉर्डने नोटीस बजावली आहे.