Team Lokshahi
Team Lokshahi
ताज्या बातम्या

भ्रम निर्माण करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे; खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

Published by : shweta walge

अमजद खान, कल्याण : मी लोकप्रतिनिधी या शहराची जबाबदारी माझी आहे. रस्त्यासह विकास कामांकरीता पाचशे ते सहाशे कोटीच्या निधीची कामे पाऊस थांबल्यावर सुरु होणार या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अशी प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रस्त्या संदर्भात मनसेकडून लावण्यात आलेल्या टिकेवर खासदार शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एमओयू झाला नाही तर वेदांत फॉक्सकॉन कंपनी इथे आली कशी आणि गेली कशी, भ्रम निर्माण करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे असाही टोला खासदार शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

एम ओ यू झाला नाही मग कंपणी इथे कशी आली? आणि कशी गेली - खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

वेदांत फॉक्सन बाबत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर भाजपने आदित्य ठाकरे यांनी चुकीची माहिती पसरलवल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी एम आय डी सी कडून एक परीपत्रक जाहीर केलय. त्यावरुन हे स्पष्ट होतय की, विरोधक अफवा पसरवत होते. प्रत्यक्षात जागा दिली नाही एम ओ यू झाला नाही मग कंपनी इथे कशी आली? आणि कशी गेली याबाबत भ्रम निर्माण केली गेल्याचे सांगितले .

अडीच महिन्यात लोक हिताच्या साडेचारशे निर्णय सरकारने घेतले तेच विरोधकांच्या डोळ्यात खुपते- श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

शिवभोजन थाळी हे चांगले पाऊल होते जे चांगले आहे. जे लोकांच्या हिताचे आहे निर्णय आहेत. हे या सरकारने घेतले आहे, गेल्या अडीच महिन्यात ४५० पेक्षा जास्त निर्णय या सरकारने घेतलेत ,बघतो पाहतो बोलतो अभ्यास करतो असं हे सरकार करत नाहीये, एवढे निर्णय झालेत लोकं सरकारच्या बाजूने आहेत हे विरोधकांच्या डोळ्यात खुपते आहे. असा टोला विरोधकांना लगावला.

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"