शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तसच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावाही सोडला. आपला महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर तातडीने भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचे आभार. विरोधी पक्षाचे लोक ते नाराज आहेत अशा वावड्या उठवत होते. पण आज एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे देशातील जनतेला राज्यातील सर्व जनते समोर आपली भूमका स्पष्ट केली. मोदी- अमित शहा यांच्या भूमिकेला पाठिंबा राहील ही अत्यंत महत्वाची भूमिका घेतली.
विरोधी पक्षांच्या सूरू असणाऱ्या वाफा वाफाच राहिल्या. देवेंद्र फडणवीस यांचा खांद्याला खांदा लावून मोठा महामार्ग निर्माण केला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आणि विकसित राज्य करण्यासाठी मोदीच्या नेतृत्वात काम केलं. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा काम केलं. मराठा ओबीसी आरक्षण आणि समाजातील सर्व घटकांना न्याय दिला . एकनाथ शिंदे आणि अजित दादा आणि फडणविस यांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून राज्याला पुढे नेलं. आजची त्यांची भुमिका महाराष्ट्राला पुढे नेणारी असल्याने भाजपच्या वतीने आभार.
मोदीच्या नेतृत्वात मोठा बहुमत राज्यात मिळालं. शिंदे हे रडणारे नाही तर लढणारे आहेत. उद्धव ठाकरें यांच्या सत्तेला लाथ मारून त्यांनी हिंदुत्वाची भुमिका साकारली. केंद्रीय नेतृत्व करतो ते आम्हाला मान्य असते. एकनाथ शिंदे यांनी आमच्या नेतृत्वाच म्हणणे मान्य केले म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो. आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर विकासासाठी आहे.
महविकास आघाडीकडे आठ मुख्यमंत्री तयार झाले होते. आम्ही राज्यातील चौदा कोटी जनतेची लढाई लढत होतो म्हणून जनतेनी आम्हाला स्वीकारलं. एकनाथ शिंदे यांनी महायुती प्रचंड मजबूत केली आहे.
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस केंद्रित नेतृत्व सोबत बसतील आणि अनेक विषयावर चर्चा होतील. केंद्रीय नेतृत्व जे निर्णय घेतली ते मान्य असेल असे स्पष्ट झालेत त्यामूळे ते केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार ते सगळ्यांना मान्य असेल.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.