Kolhapur Ambabai Mahalakshmi Temple
Kolhapur Ambabai Mahalakshmi Temple 
ताज्या बातम्या

Kolhapur Ambabai Mahalakshmi Temple : कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

Published by : Pankaj Prabhakar Rane

कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज 23 डिसेंबर 2022 पासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या BF.7 व्हेरिएंटमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. याबाबत भाविकांना मात्र अद्यापतरी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, मंदिरातील पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना आजपासून आता मंदिरात मास्क वापरावे लागणार आहे. तसेच सॅनिटायजर वापरण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.

यासोबतच मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी प्रशासनही सतर्क झालं आहे. मुंबादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी मास्क लावावा असं आवाहन मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दर्शनाला येताना मास्क लावणे सक्तीचे नाही, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भक्तांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान चीनसह जगभरात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढत आहे. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. चीनमध्ये नव्यानेच आढळून आलेला BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या व्हायरसची भारतात देखील एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ