ताज्या बातम्या

आशिष विद्यार्थी हिमाचलमध्ये, हे फेमस लाडू खाताना केली मिश्किल टिप्पणी

Published by : Team Lokshahi

बॉलिवुडमध्ये आपल्या मोजक्या भूमिकांमधून ठसा उमटवणारे आशिष विद्यार्थी सध्या स्वत:चा फुड ब्लॉग चालवत आहेत. भारतासारख्या प्रचंड खाद्यवैविध्य असलेल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये आडवीतिडवी भटकंती करत तिथल्या स्ट्रीट फुडची चव चाखत त्याचे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करण्याचा त्यांचा प्रयोग चाहत्यांनीही उचलून धरला आहे.

विद्यार्थी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साइट 'कू'वर आशिष नियमितपणे या व्हीडिओजची झलक पोस्ट करत असतात. देश-विदेशातले खवय्ये हे व्हीडिओ पाहत आवर्जून लाइक करत त्यावर भरभरून कमेंट्सही करतात.

भारतभर फिरून विविध चवी चाखतानाच नुकतेच ते पोचले थेट हिमाचल प्रदेशमध्ये. इथे त्यांच्यासाठी मित्रांनी कानपूरहून प्रेमाने आणलेले लाडू ते एकदम मजेत खाताना ‘ऐसा कोई सगा नहीं, जिसको हमने ठगा नहीं! अशी मिश्कील टिप्पणी करत ते व्हीडिओची सुरवात करतात. हे ‘ठग्गू के लड्डू’ खाताना आशिषजी त्यांची भरभरून तारीफ करत आहेत. ते सांगतात, “१९७५ मध्ये पहिल्यांदा मी हे लाडू खाल्ले होते. अजूनही यांची चव तशीच आहे. कमी गोड आणि तब्येतीला चांगले असे हे लाडू आहेत. हे खाऊन अशक्तपणा दूर होतो. चिअर्स!”

विद्यार्थी दीर्घ काळापासून खाद्यभ्रमंती करत आहेत. भारतभरातल्या खाद्यवैविध्याला मनापासून चाखत चवींना दिलखुलास दाद देणे, त्याबद्द्ल चाहत्यांना माहिती देणे हा या सफरीमागचा हेतू असल्याचे विद्यार्थी सांगतात. विशेषत: गावशहरांमधील स्ट्रीट फुड ते चाखत आहेत. याआधी मुंबईतला वडापाव आणि अमृततुल्य चहाची चव चाखत दिलसे तारीफ करणारा व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला होता. बेगुसरायच्या एका ठेल्यावर त्यांनी कचौडी-सब्जी आणि जिलेबी खाताना व्लॉग बनवला होता. सोबतच काही काळापूर्वी ते चेन्नइच्या रायर्स मेसमध्ये सांबार-वडा आणि सूरतमध्ये सूरती लोचो हा पदार्थ खातानाचेही व्हीडिओज 'कू'वर पोस्ट केले होते.

अस्सल खवय्यापलिकडेही विद्यार्थी यांची स्वतंत्र ओळख आहे. विद्यार्थी हे बॉलिवुडमधल्या नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. लहानशीही भूमिका आपल्या अभिनयाने जिवंत करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे पुरेपुर आहे.

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप