Admin
ताज्या बातम्या

सत्यजीत तुझं अपक्ष किती दिवस टिकतं ते पाहू - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांच्यासह संगमनेरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

Published by : Siddhi Naringrekar

बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांच्यासह संगमनेरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. नाशिक पदवीधर निवडणूकीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोप - प्रत्यारोप सुरु होते. याच पार्श्वभूमीवर थोरात यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात कुठेही नसेल एवढा जनसंपर्क या पाच जिल्ह्यात तांबे यांचा आहे. मी नेहमी त्यांना म्हणतो की, मला तमुची गाडी आणि ड्रायव्हरचे कौतुक वाटते. सुधीर तांबे यांनी पाचही जिल्ह्यात जिव्हाळ्याचे नाते तयार केले, हे नाते सत्यजीत तू विसरू नको. त्यांची मेहनत आणि कष्टामुळेच तुला मतदान झाले आहे. तुझे अपक्ष आता किती दिवस टिकते ते पाहू. कारण आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे काम आणखी पुढे कसे नेता येईल, अशी अपेक्षा मी सत्यजीतकडून करत आहे. असे थोरात म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या