थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Bihar Election Result 2025) आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे.मतदान केंद्रांवर मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचं मतदान हे दोन टप्प्यात 6 आणि 11 नोव्हेंबरला पार पडले. 243 जागांपैकी 122 जागांवर बहुमत आवश्यक आहे. बिहारमध्ये दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झालेले पाहायला मिळाले. प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएमची मतं मोजली जातील. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होईल.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सनुसार NDA युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीचा आज फैसला होणार असून कोणाचे पारडे असणार जड ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा NDA की महाआघाडी सरकार? कोण होणार बिहारचा बाहुबली आज याचा फैसला होणार आहे.