ताज्या बातम्या

Belgaum Black Day : सीमाभागात आज ‘काळा दिवस’; मराठी भाषिकांकडून शांत आंदोलन

कर्नाटक राज्य स्थापनेचा दिवस म्हणजेच १ नोव्हेंबर आज संपूर्ण राज्यात “कन्नड राज्योत्सव” म्हणून रंगतदार पद्धतीने साजरा होत असला, तरी सीमाभागात आजचा दिवस वेगळ्याच भावनेने साजरा केला जातो.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • सीमाभागात आज ‘काळा दिवस’

  • मराठी भाषिकांकडून शांत आंदोलन

  • ‘काळा दिवस’ का पाळतात?

कर्नाटक राज्य स्थापनेचा दिवस म्हणजेच १ नोव्हेंबर आज संपूर्ण राज्यात “कन्नड राज्योत्सव” म्हणून रंगतदार पद्धतीने साजरा होत असला, तरी सीमाभागात आजचा दिवस वेगळ्याच भावनेने साजरा केला जातो. मराठी भाषिक नागरिकांकडून हा दिवस दरवर्षी ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि आजूबाजूच्या मराठीबहुल भागात सकाळपासूनच काळे झेंडे फडकले. अनेक नागरिकांनी काळे कपडे परिधान करून शांत मोर्चांमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि स्थानिक मराठी संघटनांनी विविध ठिकाणी निदर्शने, सभा, आणि प्रतीकात्मक आंदोलनांचे आयोजन केले. मराठी भाषिकांचे म्हणणे आहे की हे प्रदेश इतिहास, भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे या भागाचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे, ही मागणी वर्षानुवर्षे केली जात आहे. “आम्ही कर्नाटक सरकारविरुद्ध नाही, पण आमच्या ओळखीच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवणार आहोत,” असे काही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

‘काळा दिवस’ का पाळतात?

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार कर्नाटक राज्याची निर्मिती झाली आणि अन्यायाने मराठी भाषिक बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि ८१४ गावे या राज्याला जोडली गेली. या घटनेचा निषेध म्हणून हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेळगाव, निपाणी आणि कारवार परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. काही ठिकाणी मराठी संघटनांच्या रॅलींना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. दरम्यान, राज्यातील इतर भागात मात्र कन्नड ध्वज फडकवत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका काढत “कन्नड राज्योत्सव” उत्साहात साजरा करण्यात आला. सीमाभागात मात्र तोच दिवस मराठी जनतेसाठी विरोध आणि आत्मभानाचा दिवस ठरला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा