ताज्या बातम्या

आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्वात? मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगून टाकले की...

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे त्यांच्या गावी गेले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये. असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्त्वात लढवल्या जाणार? यावर उत्तर देत शिंदे म्हणाले की, अजून आम्ही दिड वर्षे काम करणार आहोत. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.चिंता करु नका. गेले सात आठ महिने आम्ही जे काम केले आहे. त्यामुळे काहीजणांच्या पोटात दुखत आहे. असे शिंदे म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही. कामातून आम्ही उत्तर देणार आहोत. मी कधीही सुट्टी घेतली नाही. आता मी डबल ड्युटी करतो आहे.अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्यांना घरी बसवलं ना. त्यांच्याकडे आता काहीच काम नाही. त्यामुळे ते आरोप करत आहेत. असे शिंदे म्हणाले.

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द