Eknath shinde
Eknath shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी संपूर्ण पाठिंबा मिळणार - CM शिंदे

Published by : Sudhir Kakde

राज्यात एखादं इनोव्हेटीव्ह काम करायचं असल्यास त्याला देखील केंद्र सपोर्ट करणार आहे. आजची झालेली बैठक ही अत्यंत महत्वाची आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक सभागृहात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 7 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठक पार पडली, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. केंद्राकडून जो निधी अडवला जात होता ते आता होणार नाही कारण आता शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. तसंच सरकार स्थापन करण्यात कोर्टाच्या विषयीची काहीच अडचण नाही, मंत्री मंडळाबद्दलची चर्चा झालेली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर विचारमंथन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री, सदस्य आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष सहभागी झाले होते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर या बैठकीला अनुपस्थित होते. 2019 नंतर प्रथमच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मात्र शेवटच्या रांगेत उभे असलेले दिसले.

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द