ताज्या बातम्या

कॉंग्रेसमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर, प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

लवकरच ते मुंबईत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Shamal Sawant

कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. भोरमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणार आहे. लवकरच ते मुंबईत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या एका जेष्ठ नेत्याच्या पुढाकाराने संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. रविवारी 20 एप्रिलला भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा ते घेणार आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळली आहे.

निर्णय का घेतला ?

अनेकदा थोपटे यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झाला. पक्ष श्रेष्ठींनी दुर्लक्ष केले. या शिवाय संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. पण लोकसभेला संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांच्या कारखान्याला मंजूर केलेले कर्ज नाकारण्यात आले. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते.

थोपटे आणि पवार कुटुंबीय वाद :

भोरचे थोपटे कुटुंबिय आणि बारामतीचे पवार कुटुंबिय यांचा जुना राजकीय वाद आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते आहे. पुणे जिल्ह्यावर त्यांची मजबुत पकड होती. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना शरद पवारांनी ताकद लावून 1999 साली त्यांचा पराभव केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा