Sanjay Shirsat
Sanjay Shirsat Team Lokshahi
ताज्या बातम्या

पुन्हा मोठा राजकीय भूकंप, संजय शिरसाटाचं सूचक विधान

Published by : shweta walge

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडलं आहे. या राजकीय भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला बसला आहे. यातच आता महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याच सूचक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. एका माध्यमाशी ते बोलत होते.

काँग्रेसचे १६-१७ आमदार संपर्कात आहेत, असं बोललं जातंय, यामध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले की, “काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हेही तेवढंच सत्य आहे.”

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल, असंही शिरसाट म्हणाले.

शिरसाट यांच्या विधानामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का? आणि काँग्रेसमधील कोणता गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ