थोडक्यात
फेंगल चक्रीवादळ आज तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील अनेक भागात रेड अलर्ट
उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशात आज मुसळधार पावसाचा इशारा
फेंगल चक्रीवादळ आज तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काल ते तामिळनाडू किनाऱ्यापासून 300-350 किलोमीटर दूर होते. आज हे बंगालच्या उपसागरात तयार झालेले फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाकडून अलर्ट जारी केला आहे.