चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपनएआय या कंपनीचा माजी कर्मचारी आणि भारतीय अमेरिकन संशोधक सुचिर बालाजी यांच्या मृत्यूप्रकरण वादाचा विषय बनला आहे. सुचिर बालाजीचा मृत्यू आत्महत्या नसून त्याचा खून झाला आहे, असा दावा त्याच्या आईने केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी एलॉन मस्क यांनी मोठे विधान केले आहे.
भारतीय-अमेरिकन संशोधक सुचिर बालाजी यांचा मृतदेह ते वास्तव्यास असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमधील बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमधील घरात आढळून आला होता. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयानेही सदर मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र पौर्णिमा रामाराव यांनी आता एफबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “सुचिरच्या घरात तोडफोड आणि बाथरुममध्ये झटापटीच्या खुणा दिसत आहेत. बाथरुममध्ये रक्ताचे डाग दिसून येत असून तिथे त्याला मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसते. मात्र पोलिसांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या दाखवून आमच्यावर अन्याय केला आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरातील पोलीस आम्हाला न्याय मिळण्यापासून रोखू शकत नाही, मी या प्रकरणाची एफबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करते.” त्यांच्या या पोस्टला टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क कमेंट यांनी या आवाहनाचे समर्थन केले.
चॅटजीपीटी’ची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’ (OpenAI) या कंपनीचा माजी कर्मचारी आणि भारतीय-अमेरिकन संशोधक सुचिर बालाजीचा २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरात मृतदेह आढळून आला होता. सुचिरने ओपनएआय कंपनीच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केली होती. आत्महत्येमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.