ताज्या बातम्या

Beed Ram Khade Attack : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पण यामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत.

Published by : Varsha Bhasmare

राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पण यामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारांसाठी अहिल्यानगरमधून पुण्याला हलवण्यात आलं आहे.

नेमकी घटना काय?

बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर रात्री नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. नगरकडे हॉटेलमध्ये जेवण करून निघाल्यानंतर 10 ते 15 जणांनी रात्रीच्या वेळी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला.राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले.

हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. तर यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे.

कोण आहेत राम खाडे?

राम खडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते आहेत. ते आष्टी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात ते सक्रिय असतात. त्यांनी भाजपा आमदार सुरेश धस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत. आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी आवाज उठवला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा