सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोने-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२८,०७० रुपयांवर पोहोचले. तसेच, चांदीही प्रचंड महागली आहे.
सोने-चांदीच्या किंमती लग्नसराईच्या काळात वाढलेली खरेदी, जागतिक बाजारात वाढ आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदराचे संकेत यांवर अवलंबून असल्याने दर वाढतआहे. या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्येही रस दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,26,081 रुपये इतका असून चांदीचा दर प्रति किलो ग्रॅम 1,59,025 रुपयांवर पोहचला आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष पायवर केंद्रित
भारताची राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १२८,०७० रुपयांवर पोहोचला असून २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ११६,६१० रुपये आहे. तसेच, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या शहरात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ११७,२६० रुपये तर, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १२७,९२० रुपयांवर पोहोचले आहे. सोन्यासोबत चांदीचे दर ही उसळी मारत आहे. आज त्याची किंमत प्रति किलोग्रॅम १६९,१०० रुपयांवर पोहोचली आहे. आजच्या चांदीच्या भावात 4 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.
फेडरल रिझर्व्ह इम्पॅक्ट
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अधिकारी क्रिस्टोफर वॉलर यांनी कामगार बाजार कमकुवत होत असल्याचे सांगितले असून डिसेंबर महिन्यात ०.२५% व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली असून ज्यामुळे किमतींना आधार मिळत आहे. परंतु, या सोने-चांदीच्या वाढत्या भावामुळे ग्राहक मात्र हिरमुसले आहेत. कारण, लग्नाच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, त्याच काळात सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.