नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिकस्थळ हटवण्यात आलं. 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर नाशिक महापालिकेनं कारवाई केली. त्यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
त्यातच आदल्या रात्री परिसरात काही अज्ञात समाज कंटकांनी दगडफेक केली. 400 हून अधिक जणांच्या जमावाकडून रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी आता काही लोकांना ताब्यात घेण्यात आले 57 संशयितांच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाईला सुरुवात झाली असून व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.