Team India, T20 World Cup
Team India, T20 World Cup 
ताज्या बातम्या

T20 World Cup : टीम इंडियात 'या' दहा खेळाडूंची होणार निवड, अनेक दिग्गजांचा झाला पत्ता कट

Published by : Naresh Shende

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, दहा खेळाडूंची टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्डकपच्या स्क्वॉडमध्ये निवड पक्की मानली जात आहे. हे खेळाडू फिट राहिले आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली, तर टीम इंडियात या खेळाडूंची निवड निश्चित असल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंच्या निवडीबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. कुणाची निवड होणार आणि कुणाला या वर्ल्डकपला मुकावं लागणार आहे, याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आयपीएल २०२४ च्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारावर खेळाडूंच्या निवडीबाबत स्पष्ट संकेत मिळाले आहेत. काही खेळाडू असे आहेत, ज्यांची निवड निश्चित असल्याचं बोललं जात आहे. तर काही खेळाडूंबाबत संशयात्मक भूमिका वर्तवण्यात येत आहे.

या खेळाडूंची निवड पक्की

दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार १० खेळाडू असे आहेत, ज्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या दहा खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या. यातील बहुतांश खेळाडूंनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. फक्त मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली नाहीय. पण सिराज दिर्घकाळापासून भारतासाठी खेळत आहे आणि वर्ल्डकपसाठी तो महत्त्वाचा खेळाडू असल्याचं म्हटलं जात आहे.

हार्दिक पंड्याची कामगिरीही समाधानकारक नाहीय. परंतु, तो अष्टपैलू खेळाडू असल्यानं त्याची निवड जवळपास निश्चित आहे. तसंच या लिस्टमध्ये काही दिग्गज खेळाडूंचा समावेश नाहीय. संजू सॅमसन आणि के एल राहुलसारखे खेळाडूंचा या संघात समावेश नाहीय. याशिवाय शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालही या १० खेळाडूंच्या यादीत नाहीय. युजवेंद्र चहलच्या नावाचाही उल्लेख नाहीय. कमालिचा फॉर्मात असलेला शिवम दुबेचीही निवड या खेळाडंच्या लिस्टमध्ये करण्यात आली नाहीय.

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री