KKR vs RCB, IPL 2024
KKR vs RCB, IPL 2024 
ताज्या बातम्या

IPL 2024 : RCB चा खेळ खल्लास! 'तो' खेळाडू रन आऊट झाल्यानं KKR विरोधात झाला निसटता पराभव

Published by : Naresh Shende

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकाहून एक रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. ईडन गार्डनमध्ये आज झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ विकेट्स गमावून २२२ धावा केल्या होत्या. फिलिप सॉल्टने वादळी खेळी करून १४ चेंडूत ४८ धावा कुटल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी. तसच रमनदीप सिंगने ९ चेंडूत २४ धावा केल्यानं केकेआरला २०० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण अखेरच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज असताना दुसरी धाव घेताना लॉकी फर्ग्युसन धावचीत झाला अन् आरसीबीचा निसटता पराभव झाला. आरसीबीचा संघ २२१ धावांवर सर्वबाद झाल्यानं अवघ्या एका धावेनं कोलकाताचा विजय झाला.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस ७ धावांवर बाद झाल्यानं स्वस्तात माघारी परतला. तर विराट कोहलीला धावांचा सूर गवसला होता. पण विराट १८ धावांवर असताना हर्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदारने धडाकेबाज फलंदाजी करून अर्धशतकी खेळी केली. जॅक्सने ३२ चेंडूत ५५ धावा, तर रजत पाटीदारने २३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यानंतर सुयश प्रभुदेसाई (२४), दिनेश कार्तिक (२५), कर्ण शर्माने (२०) धावा करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं होतं.

परंतु, शेवटच्या चेंडूवर आरसीबीला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना रमनदीप आणि सॉल्टने लॉकी फर्ग्युसनला धावचीत केलं. त्यामुळे आरसीबीचा या सामन्यात निसटता पराभव झाला. कोलकातासाठी हर्षित राणाने २, मिचेल स्टार्कने १, वरुण चक्रवर्तीने १, तर सुनील नारायणने २ विकेट घेतल्या. तर आरसीबीसाठी सिराजने १, यश दयाल २, लॉकी फर्ग्युसनला १ आणि ग्रीनला २ विकेट मिळाल्या.

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप