राज्यामध्ये सध्या 'लाडकी बहीण योजना' संदर्भातील अनेक अपडेट्स समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेल्या फॉर्मची पडताळणी केली जात आहे. सरकारने आता या योजनेमध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या 9 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. त्याबद्दलची नवीन माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहीणींच्या फॉर्मची पडताळणी करण्यात आली. यामध्ये 5 लाख बहिणी अपात्र झाल्याचे समोर आले होते. अशातच आता अजून 4 लाख बहिणी अपात्र असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राज्य सरकारची 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र बहीणींना मिळावा यासाठी सरकारकडून सरकार नवीन नियम लागू करणार आहे. लाडक्या बहीणींना आता दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान लाडक्या बहीणींना दरवर्षी जून ते जुलै या कालावधीमध्ये लाभार्थी महिलांना बँकेत ई-केवायसी करावी लागणार आहे. तसेच महिलेच्या कुटुंबाचे इन्कम टॅक्स रेकॉर्डस् तपासले जाणार आहेत.