राजकारण

Eknath Shinde Meets Liladhar Dake : एकनाथ शिंदेंनी घेतली शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट; भेटीगाठींमागची कारणं काय?

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा जुन्या शिवसैनिकांना भेटण्याचा सिलसिला अद्याप कायम आहे. काही दिवसांपूर्वी दोन वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता शिंदे ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांची भेट घेतली. डाके हे बाळासाहेब ठाकरेंपासूनचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यानंतर आता शिंदे मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या भेटीला जाणार असून संध्याकाळी पाच वाजता ही भेट असेल.

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली होती. तर नेत्यांच्या यादीपैकी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे आधीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केल्यानंतर अनेक शिवसैनिक त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज लिलाधर डाके यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर देखील लीलाधर डाके यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

भेटीगाठींमागची कारणं काय?

एकनाथ शिंदेंच्या जुन्या नेत्यांच्या भेटीमागील प्रमुख कारण म्हणजे या नेत्यांनी आपल्या बाजून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. जेव्हा शिवसेनेच्या बारा खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंब जाहीर केला तेव्हा किर्तीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. यापार्श्वभूमीवर किर्तीकर यांची भेट घेऊन शिंदे यांनी वेगळं वातावरण तयार करण्याचं काम केलं होतं.

आता ज्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत शिवसेना वाढवली त्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे भेटी घेत आहेत. आम्ही अद्यापही जुन्या नेत्यांना विसरलेलो नाही त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत आणि त्यांची विचारपूसही करत आहोत, हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

"शिवसेनाप्रमुखांची डरकाळी शिवाजी पार्कमध्ये घुमायची, पण आज उबाठाने..." CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Daily Horoscope 18 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे दारिद्र्य दूर होऊन येतील चांगले दिवस; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 18 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

House of the Dragon Season 2: बहुप्रतिक्षीत वेबसिरीज 'हाऊस ऑफ द ड्रॅगन सिझन २' चा ट्रेलर प्रदर्शित

Phone Charging: मोबाईल फोन दिवसातून किती वेळा चार्ज करावा?