राजकारण

पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? राऊतांचा घणाघात

उद्धव ठाकरे यांचे मालेगावात सभा होत असून त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची शिवगर्जना आढावा बैठक संजय राऊतांनी घेतली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संदीप जेजुरकर | नाशिक : पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात सभा होत असून त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची शिवगर्जना आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्यात सत्तेवर असलेले सरकार बेकायदेशीर आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर विचार होणार आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे बेकायदेशीर सरकार शंभर टक्के जाणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, २६ तारखेला मालेगावला उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना पाडण्यासाठी नव्हे तर गाडण्यासाठी येणार आहे. ज्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले, ते सत्तेसाठी सोडून गेलेल्या व लाचार असलेल्या या गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असा पुनरुच्चार खा.संजय राऊत यांनी केला.

निवडणूक आयोगाचाही राऊतांनी खास शैलीत समाचार घेतला. पक्ष आणि पद काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? असा घणाघातही राऊत यांनी केला. शेतकरी कष्टकरी रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावरील या सरकारकडे नैतिकता उरलेली नाही. दरम्यान, मालेगावची जागा ही शिवसेनेची असून येणाऱ्या काळात शिवसेना उपनेते अद्वय हिरे सभागृहात दिसतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज पहाटे 6 वाजल्यापासून भाविकांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन सुरू

Latest Marathi News Update live : मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळला

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार