राजकारण

नितीन गडकरींकडून शरद पवारांचे कौतुक; म्हणाले, पंजाबराव देशमुख यांच्यासारखंच काम...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांचा 125 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल 5 लाख रुपये रोख व पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना देण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विषयी पंजाबराव देशमुख यांच्या मनात अफाट प्रेम होतं. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचलं पाहिजे. भाऊसाहेब यांच्या मनात शेतकऱ्यांसाठी विशेष कळवळा होता. शेतीबरोबरच त्यांचा शिक्षण क्षेत्रावर मोठा भर होता. तळागाळातील माणसांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. विदर्भातील गावागावात त्यांनी शिक्षणाचे जाळे विणले. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विदर्भात लाखो लिटर दूध उत्पादन झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

पंजाबराव देशमुख यांच्यासारखंच काम शरद पवार यांचं काम आहे. शरद पवारांनी देखील पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचं मोठ जाळं उभं केलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शरद पवार यांचं काम आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात शरद पवारांनी काम केलं आहे. शरद पवार यांच्या अनेक प्रयोगाचा विचार केला पाहिजे. पंजाबराव देशमुख यांच आणि शरद पवार यांचही नाव मोठं आहे, असे म्हणत नितीन गडकरींनी शरद पवारांचे कौतुक केले आहे.

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द