राजकारण

मुख्यमंत्री शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, दबावाचे राजकारण...

Published by : Sagar Pradhan

राज्यात शिवसेना (ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचीशी बंद दाराआड चर्चा देखील केली. त्यावरच आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांनी या भेटी दरम्यान 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा गुलदस्त्यात असल्याने वंचित आणि शिंदे गट एकत्र येणार का? हा प्रश्न अंधातरीच राहिला आहे. यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया देत, “दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय,” असे म्हटलं आहे.

पुढे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर देखील भाष्य केले आहे . “२० नोव्हेंबरला प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. ही भेट राजकीय नाही. वंचित बहुजन आघाडीचा युतीसाठी प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यास उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील,” असेही सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला