राजकारण

नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबई शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला साथ देत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला विशेषता विद्यमान ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांना मोठा झटका बसला आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच वंचित आघाडीने देखील शिंदे गटाला साथ दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच नवी मुंबई शहरात शिंदे गटाने आपली पायाभरणी सुरू केल्याचे चर्चा रंगली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख विजयानंद माने, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, माजी नगरसेवक मनोहर जोशी, नेरूळच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत नरेश म्हस्के यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ