राजकारण

राज ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर? हनुमान गढ़ीच्या महंतांनी दिले निमंत्रण

राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोई माई का लाल रोक नही सकता; हनुमान गढ़ीचे महंतांनी मनसेप्रमुखांना निमंत्रण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणूक आयोगाने शिवेसनेचे चिन्ह गोठवल्याने ठाकरे आणि शिंदे गटाला आता ते वापरता येणार नाही. याकडे सर्वांचे लक्ष असतानाच दुसरीकडे विश्व हिन्दू सेवा संघचे प्रमुख मार्गदर्शक अयोध्या हनुमान गढ़ीचे प्रमुख महंत राजूदास महाराज व उदासीन आखाडाचे महंत धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी महंतांनी अयोध्या भेटीसाठी त्यांना निमंत्रण दिलं आहे. तर, राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महंत राजूदास महाराज म्हणाले की, राज ठाकरे यांना आमचे आशीर्वाद आहे. सनातन धर्म संस्कृती सांभाळण्याचे ते काम करतात. त्यांना आज अयोध्या भेटीसाठी निमंत्रण दिलं आहे. अयोध्येत त्यांना कोणताही विरोध होणार नाही. राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून कोई माई का लाल रोक नही सकता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, हा दौरा काही कारणास्तव स्थगित करण्यात आला होता. कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून त्यांनी दौरा स्थगित केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. यामुळे महंतांच्या निमंत्रणानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याला बैठकीत उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana: 'आमचे पैसे घेऊन विरोधकांचं कौतुक चालणार नाही' महाडिकांची महिलांना धमकी

MVA On Dhananjay Mahadik: महाडिकांची लाडक्या बहिणींना धमकी, विरोधकांकडून समाचार

Manoj jarange On Devendra Fadnavis: ' पाच वर्षात काय ..? ' ; मनोज जरांगेंनी फडणवीसांना जाब विचारला

Uddhav Thackeray Sangola: सांगोल्या उद्धव ठाकरे कडाडले, ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Dev Diwali 2024: देव दिवाळी म्हणजे काय? जाणून घ्या कधी साजरी केली जाते देव दिवाळी