Mumbai-Pune Highway Bus Accident 
ताज्या बातम्या

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस दरीत कोसळली,बचावकार्य अद्यापही सुरु

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली...

Published by : Pankaj Prabhakar Rane

रायगड : भारत गोरेगावकर | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. बाहेर काढण्यात आलेल्या 16 जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा