(Maharashtra Election 2025 Postponed) राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे मत आहे की आयोगाने नियमांची चुकीची व्याख्या करून सर्वच निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे अयोग्य आणि समजण्यापलीकडचा आहे.
बावनकुळे म्हणाले,
“नगरपरिषद निवडणुकांबाबत आयोगाने मोठी चूक केली आहे. आम्ही नियमांनुसार त्यांना अनेकदा सूचना केल्या, पण तरीही आयोगाने आमचे म्हणणे ऐकले नाही. निवडणूक प्रक्रिया नीट समजून न घेता सरसकट निकाल स्थगित करणे ही चुकीची पद्धत आहे. इतक्या मोठ्या गोंधळानंतर आता आयोगानेच ही परिस्थिती नीट करणे आवश्यक आहे. आम्ही प्रचार करायचा आणि शेवटच्या क्षणी आयोगाने पत्र काढून निवडणूक पुढे ढकलायची हे योग्य नाही. न्यायालयाचा निर्णय मान्य, परंतु आयोगाच्या चुकीमुळेच परिस्थिती निर्माण बावनकुळे
ते पुढे म्हणाले,
“नागपूर खंडपीठाचा आदेश सरकारला व आयोगाला पाळावा लागतो, परंतु नियमांचा चुकीचा अर्थ काढून आयोगाने निर्णय घेतल्यामुळे ही वेळ आली आहे. या प्रकरणात कुणी हरकत घेतली नव्हती, तरीही सर्वत्र निवडणुका थांबवण्याचा निर्णय करण्यात आला. जर आक्षेप असलेल्या ठिकाणीच निवडणूक पुढे ढकलली असती तर ठीक होते. पण आजवर राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजात असा प्रसंग आलेला नव्हता.”
बावनकुळे यांनी आयोगावर जोरदार टीका करत म्हणाले,
“निवडणूक वेळोवेळी पुढे ढकलणे किंवा मतमोजणी थांबवणे हे कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य नाही. कोणत्याही पक्षाने या निर्णयाला पाठिंबा दिलेला नाही. सर्वपक्षीय चर्चा झाली नाही, संवादही झाला नाही. अशी एकतर्फी पद्धत म्हणजे जनतेला अडचणीत टाकणं आहे. या घोळामुळे अनेक उमेदवार आणि पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. शेवटच्या क्षणी असे निर्णय घेणे हे राज्यातील नागरिकांविरुद्ध केलेले पाऊल आहे. हा संपूर्ण प्रकार अनाकलनीय असून मी याबाबत माझी ठाम अप्रसन्नता नोंदवतो.”