Pune Mumbai Ganpati Visarjan 2025 : मुंबई-पुण्यात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा विक्रमी उत्साह Pune Mumbai Ganpati Visarjan 2025 : मुंबई-पुण्यात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा विक्रमी उत्साह
ताज्या बातम्या

Pune Mumbai Ganpati Visarjan 2025 : मुंबई-पुण्यात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा विक्रमी उत्साह

मुंबई-पुण्यात अनंत चतुर्दशीचा जल्लोष; गणेश विसर्जन मिरवणुकींनी मोडले विक्रम

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रचंड उत्साह

पुण्यात तब्बल 30 तासांहून अधिक काळ मिरवणूक सुरू आहे

मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी भाविकांचा सागर उसळला आहे..

मुंबई, पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रचंड उत्साहात सांगता झाली. दहा दिवस चाललेल्या या उत्सवाचा शेवट भक्तिरसाने आणि जल्लोषाने झाला. यंदा मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकांनी विक्रम मोडले. पुण्यात तब्बल 30 तासांहून अधिक काळ मिरवणूक सुरू होती, तर मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी भाविकांचा सागर उसळला होता.

मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली तरी भक्तांचा उत्साह अबाधित राहिला. शहरात एकूण 36,632 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये 5,855 सार्वजनिक गणेशमंडळे आणि 30,468 घरगुती गणपतींचा समावेश होता. काही ठिकाणी मात्र अपघातांच्या घटना घडल्या ज्यामुळे आनंदाला थोडासा धक्का बसला.

पुण्यातील मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन तब्बल दीड दिवस सुरू राहिली. मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेत पार पडले. दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत झाले. शनिपार मंडळाने उभारलेला 35 फूट उंच देवमासा यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट! 100 मोबाईलसह सोन्याच्या चेनवर हात साफ; पोलिसांची कारवाई सुरू

Manoj Jarange Patil At Narayangadh :"...तर आम्ही मुंबईचं भाजीपाला दूध बंद करू" जरांगेंची मोठी घोषणा! दसरा मेळाव्याच्या तयारीला लागण्याचे मराठा समाजाला आवाहन

Mumbai Lalbaugcha Raja Visarjan 2025 : कोळाबांधवांची अवहेलना, भक्तांसोबत अरेरावी अन्... कार्यकर्त्यांचा माज अखेर उतरला; थेट CMला पाठवलं पत्र

Nepal Violence : नेपाळमध्ये सोशल मीडिया अ‍ॅप्सवर का लावण्यात आली बंदी? यामुळे तरुण खवळले; 80 हून अधिक लोक...