ताज्या बातम्या

Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी; रोहिणी खडसेंनी व्यक्त केला संताप

राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वैष्णवीचे आई-वडील यांची नुकतीच भेट घेतली असून या प्रकरणी अनेक खुलासे त्यांनी केले.

Published by : Rashmi Mane

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात सर्वच राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायाची मागणी केली असून विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वैष्णवीचे आई-वडील यांची नुकतीच भेट घेतली असून या प्रकरणी अनेक खुलासे त्यांनी केले. तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या कामकाजावर त्यांनी टीका केली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, "मी वैष्णवीचे आई-वडील, कस्पटे कुटुंबाची काल भेट घेतली. वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणातील सर्व पुरावे, फोटो त्यांनी मला दाखवले. त्यांचा आक्रोश पाहिल्यानंतर या घटनेमध्ये काय काय झालं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. कारण तिच्या अंगावर १९ ठिकाणी ज्या जखमा झाल्या होत्या. त्या सगळे फोटो त्यांनी मला दाखवले. अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासऱ्यांनी घेतला, असं माझं म्हणणं आहे. कस्पटे कुटुंबाला भेटून त्यांना हा विश्वास दिला, की आम्ही सगळे मिळून वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत. पोलिसांत या प्रकरणी जी एफआयआर नोंदवली केली आहे. त्यातही सौम्य प्रकारचे कलम लावल्याचे दिसते, ते कठोर कलम असावेत, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील देणार आहेत. ज्यामुळे आरोपींना कठोरच शिक्षा झाली पाहिजे. ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालावी आणि वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे."

तर रुपाली चाकणकर यांच्याबाबत बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, "वैष्णवीच्या केसमध्ये जी तिची हत्या झालेली आहे. तिच्या सासरे लोकं हे त्याच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. अजितदादा, सुनेत्राताई, अदिती तटकरे या सगळ्यांसोबत त्यांचे जे आपुलकीचे, जवळीकतेचे फोटो आहेत. त्यावरून त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत, हे दिसतं. जर वैष्णवीच्या जखमा पाहिल्या तर ती आत्महत्या असल्याचे दर्शवत नाही, तिची हत्या झाल्याचाच संशय बळावतो. तिला प्रचंड मारहाण झालेली आहे. तिचा मृत्यू होण्यासाठी तिच्या शरिरावर रॉडच्या खुणा दिसत आहेत. त्याच दिशेने चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. कारण ही आत्महत्या असू शकत नाही. हा सगळ्यांनाच संशय आहे. या केसमध्ये महिला आयोगाच्या अक्षम्य चुका झाल्या आहेत. आयोगाच्या अध्यक्षा या पार्ट टाईम असून राज्याला फुल टाईम महिला आयोगाला अध्यक्ष हवे आहेत."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Protest : मराठा आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला कडक इशारा

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

Landslide : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; 19 कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Manoj Jarange Protest - “ मराठा आंदोलनाला परवानगी सरकारने दिलीच कशी?” ; हायकोर्टाचा थेट सवाल