ताज्या बातम्या

Rohit Pawar : तपोवनातील वृक्षतोडीवरून रोहित पवारांचा गिरीश महाजनांवर निशाणा

2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik kumbh Mela 2027) तयारीला वेग आला असून साधू-महंतांसाठी साधूग्राम (Sadhugram)तपोवन परिसरातील 1150 एकर जागेवर उभारण्याचे काम नियोजित आहे.

Published by : Varsha Bhasmare

2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik kumbh Mela 2027) तयारीला वेग आला असून साधू-महंतांसाठी साधूग्राम (Sadhugram)तपोवन परिसरातील 1150 एकर जागेवर उभारण्याचे काम नियोजित आहे. मात्र या बांधकामासाठी सुमारे 1800 झाडे तोडण्याचा (Tapovan Tree Cutting) प्रस्ताव असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.

वृक्षतोडीच्या विरोधात नाशिककरांसह पर्यावरण कार्यकर्ते आणि काही सेलिब्रिटीही रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. तर ठाकरे बंधुंसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या वृक्षतोडीवरून कुंभमेळा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना विशेषतः नाशिकच्या कारभाऱ्यांना केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा कळते. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावाने जमीन लीजवर घेऊन लाटायची हाच सत्ताधाऱ्यांचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरु आहे, असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केलाय.

हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज

रोहित पवार पुढे म्हणाले की, गुंडाचा वापर करून एखादं दुसरी नगरपालिका बिनविरोध केली, म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी त्याच पद्धतीने तपोवन खाली करता येईल, हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे, अशी टीका त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा