ताज्या बातम्या

Sanjay Raut : जर कोणी अस्वस्थ असतील, नाराज असतील आमचे सहकारी तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढू

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज भरला. विश्वजीत कदम उपस्थित राहू शकले नाही. त्यांची तब्येत जरा पुण्यामध्ये आहेत ते आजारी आहेत. येत्या 2 दिवसांमध्ये विश्वजीत कदम सांगलीत येऊन काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील. काँग्रेस पक्ष सुद्धा सांगलीमध्ये कामाला लागलेत. हा विषय फक्त सांगलीचा नाही. महाराष्ट्राच्या 48 मतदारसंघामध्ये आम्ही याच पद्धतीने काम करतो आहोत. काल माननीय शरद पवार साहेब नगरला होते. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे होते. नगरमधील एक प्रचंड सभा निलेश लंके यांच्या विजयासाठी झाली.

उद्धव ठाकरे पुढील 2 दिवसांमध्ये विदर्भात जात आहेत. जिथे एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, अमरावतीला काँग्रेसचं उमेदवार आहेत तिथे प्रचारसभा घेत आहेत. आमच्यामध्ये हा माझा उमेदवार हा तुझा उमेदवार असं नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार. त्यामुळे सांगलीचा विचार त्यापेक्षा वेगळा नाही. विशाल पाटील हे समजूतदार आहेत. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातलं प्रमुख सदस्य आहेत. वसंतदादा पाटील त्यांचे आजोबा आहेत. विशाल पाटील आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

यासोबतच संजय राऊत म्हणाले की, विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. विशाल पाटील यांचा आमच्याशी उत्तम संवाद आहे. लोकशाही आहे. काही भावना असतात. प्रत्येकाची इच्छा असते. मी हे अनेकदा मान्य केलं आहे की शिवसेना इथं लोकसभा प्रथमच लढते आहे. परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे. याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही. पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. जर कोणी अस्वस्थ असतील, नाराज असतील आमचे सहकारी तर आम्ही नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि मार्ग काढू. विशाल पाटील काय आमचे शत्रू आहेत का? असे संजय राऊत म्हणाले.

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द