नागपुर : सध्या महाराष्ट्रभर उन्हाळा खडक आहे त्यातही विशेष करून विदर्भातील पट्ट्यामध्ये उन्हाळ्याचे तापमान सध्या चाळीस अंशांच्या वर (Rise in Temperature) पोहोचले आहे त्यामुळे लोकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे त्यामुळे आरोग्य विभागाकडून लोकांना अनेक सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून कुणालाही उष्माघात अथवा अन्य कोणताही त्रास उन्हामुळे (Summer) होऊ नये. बुधवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला, चंद्रपूर आणि वर्धा येथे ४४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे विदर्भ होरपळले आहे.
जळगाव, मालेगाव परभणी, अमरावती, गोंदिया, नागपूर, वाशीम येथे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सध्या दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर रायलसीमापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात गुरुवारपासून (ता. २१) वादळी वारे, मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
शहर आणि परिसरात बुधवारी अंशतः ढगाळ वातावरणाचे सावट पाहायला मिळाले. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच कायम राहणार असल्याची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी हवामान पोषक होत असून पुण्यावर ही याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.