ताज्या बातम्या

International Womens Day : महिलांसाठी सरकारच्या 'या' काही खास योजना

महिलांसाठी खास योजना: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'लेक लाडकी', 'महिला उद्योगिनी' आणि इतर योजनांच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण.

Published by : Team Lokshahi

दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने या दिवसाची सुरुवात केली. महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महिलांसाठी नेहमीच सरकार नवनवीन योजना घेऊन येते. सरकारने कोणत्या खास योजना महिलांसाठी सुरु केल्या आहेत त्याबद्दल आता जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी या योजनेला मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ मिळतो.

लेक लाडकी योजना :

'लेक लाडकी योजना' 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्षे वयापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

महिला उद्योगिनी योजना :

'महिला उद्योगिनी योजना'च्या माध्यमातून महिलांना उद्योजिका-व्यावसायिका म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. देशात सर्वप्रथम कर्नाटकातील सरकारने ही योजना सुरू केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची देशभरात अंमलबजावणी सुरू केली. देशभरात केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून 'महिला उद्योगिनी योजना' राबवली जात आहे.

स्वर्णिमा योजना :

देशातील सामाजिक-आर्थिक मागास महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एक कार्यक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत 5 टक्के वार्षिक व्याजदराने 2 लाख रुपयांनपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देण्यात येते.

महिला सन्मान योजना :

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांना पैसे वाचवण्यासाठी आणि स्वत:साठी आर्थिक स्वावलंबन निर्माण करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी सरकारने सुरू केली आहे. महिलांच्या नावे 2 वर्षांसाठी निश्चित व्याजदरावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना :

महाराष्ट्रामध्ये विधवा महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी 'इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना' आहे. या योजनेत, पिवळे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील 40 ते 65 वर्षे वयोगटातील विधवांना दरमहा 600रुपये पेन्शन मिळते.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केली. 'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने' अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना' ही केंद्र सरकारची योजना आहे. ही महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजना :

'माझी कन्या भाग्यश्री योजना' ही महाराष्ट्रातील मुलींसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. मुलींच्या शिक्षणास आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत मुलगी 6 वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी 25,000 रुपये आर्थिक मदत मिळते. तसेच, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर विवाहासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी 50,000 रुपये अतिरिक्त मदत दिली जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gunratan Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या “मटण हंडी” विनोदावर सदावर्तेंचा टोला; “हीच ठाकरे यांच्या विचारांची हंडी”

Independence day 2025 : स्वातंत्र्यदिन साजरा करताना तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वज फडकवताना 'हे' नियम पाळा

Viral Video Raj Thackeray : दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्किल टिप्पणी “मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो”

'या' नेत्याच्या घरी मटण पार्टीचे आयोजन; थेट फडणवीसांना आमंत्रण, नेमकं प्रकरण काय?