Admin
Admin
ताज्या बातम्या

लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

Published by : Siddhi Naringrekar

लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्र आहे. यापैकी 120 एकरवरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनौसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकासह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान मोठ्या रेल्वेस्थानकांचा कायापलट करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट अशा अवघड मार्गांवर देखील भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री