ताज्या बातम्या

Earthquake : पश्चिम तुर्की हादरलं! 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने इमारती कोसळल्या

जगभरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तीव्र भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले आहेत. पुन्हा एकदा त्यानंतर आता तुर्की या देशामध्ये 27 ऑक्टोबरला सोमवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • तुर्कीमध्ये सोमवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले.

  • तब्बल तीन ते चार इमारती कोसळल्या आहेत.

  • 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने इमारती कोसळल्या

जगभरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तीव्र भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले आहेत. पुन्हा एकदा त्यानंतर आता तुर्की या देशामध्ये 27 ऑक्टोबरला सोमवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के इतके तीव्र होते की, त्यामुळे तब्बल तीन ते चार इमारती कोसळल्या आहेत.

या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. सोमवारी रात्री दहा वाजून 48 मिनिटांच्या आसपास पश्चिम तुर्कीमधील इस्तांबूल, बुरुसा मानसा आणि या भागांमध्ये हे धक्के जाणवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संकटकालीन उपाययोजना म्हणून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यावर तुर्कीचे गृहमंत्री अली एरलीकाया यांनी सांगितलं की, या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत तीन इमारती आणि एक दुकान कोसळलं आहे. यामध्ये अद्याप कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

तुर्की मध्ये 2023 साली दरम्यान आगोदर अशाच प्रकारचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. याबाबत रेडक्रॉस संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सिरीयामध्ये आलेल्या भूकंपाने 55000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. तब्बल 7.8 स्केल या भूकंपाची तीव्रता एवढी होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा