इतर

रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; चुकूनही विसरू नका ‘या’ गोष्टी

Published by : Siddhi Naringrekar

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा होणारा सण, भाऊ बहिणीच्या नात्याचा हक्काचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी रक्षाबंधनाचा सण गुरुवार ११ ऑगस्ट २०२२ च्या संध्याकाळपासून सुरू होईल आणि तिथीनुसार शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ च्या सकाळपर्यंत रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि ओवाळते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रक्षाबंधनाच्या थाळीची सजावट कशी करावी हे जाणून घेणार आहोत.

ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी असाव्यात

कुंकू

ओवळीणीत भावाच्या कपाळावर टिळा लावला जातो. यासाठी ओवाळणीच्या ताटात कुंकू असावं.

राखी

रक्षाबंधनासाठी तयार करायच्या थाळीत राखी असायलाच हवी.

निरंजन

रक्षाबंधनाच्या थाळीत निरंजन व फुलवात असावी. साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल.

तांदूळ

टिळा लावल्यावर त्यावर तांदूळ लावण्याची सुद्धा पद्धत आहे. असं म्हणतात ज्या बहिणीचे जितके तांदूळ भावाच्या कपाळावर राहतात तितकं अधिक त्या नात्यात प्रेम असतं.

मिठाई

थाळीत मिठाई ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही बनवलेली एखादी गोडाची रेसिपी सुद्धा तुम्ही भावाला खाऊ घालू शकता.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला