लोकशाही स्पेशल

दिनविशेष 19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 19 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

गणेश चतुर्थी

२०२१: कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक - ला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर झाला.

२०१७: पुएब्ला भूकंप २०१७ - मेक्सिको मध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान ३७० लोकांचे निधन तर ६ हजार हुन अधिक लोक जखमी.

२००७: युवराजसिंग - हे टी-२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले.

२०००: कर्नाम मल्लेश्वरी - यांनी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या.

१९८५: मेक्सिको सिटी भूकंप - भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे ४०० इमारती उद्ध्वस्त झाल्या.

१९५७: प्लंबबॉब रेनियर अणुबॉम्ब - हा पहिला आण्विक स्फोट बनला जो संपूर्णपणे भूगर्भात समाविष्ट होता, त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.

१८६८: ला ग्लोरिओसा क्रांती - स्पेनमध्ये सुरू झाली.

१७९९: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध - बर्गनची लढाई: रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच-डच यांचा विजय.

आज यांचा जन्म

१९७७: आकाश चोप्रा - भारतीय क्रिकेटपटू

१९६५: सुनिता विल्यम - भारतीय-अमेरिकन अंतराळवीर

१९५८: लकी अली - गायक, अभिनेते व गीतलेखक

१९४०: पिनाकी चौधरी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (निधन: २४ ऑक्टोबर २०२२)

१९२५: बाबूराव गोखले - नाटककार (निधन: २८ जुलै १९८१)

१९१७: अनंतराव कुलकर्णी - कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (निधन: ६ नोव्हेंबर १९९८)

१९१२: रुबेन डेव्हीड - भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक - पद्मश्री (निधन: २४ मार्च १९८९)

१८६७: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (निधन: ३१ जुलै १९६८)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: बिष्णू सेठी - भारतीय लेखक आणि राजकारणी, ओडिशाचे आमदार (जन्म: ५ जून १९६१)

२००७: दत्ता डावजेकर - मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

२००७: डी. डी - संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

२००४: दमयंती जोशी - सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना - पद्मश्री (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००२: प्रिया तेंडुलकर - रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

१९९३: दिनशा के. मेहता - म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी

१९९२: ना. रा. शेंडे - साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष

१७२६: खंडो बल्लाळ चिटणीस - छत्रपती संभाजी वव छत्रपती राजारामस्वीय सहाय्यक

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prithviraj Chavan : "दहशतवादाला जात धर्म नसतो" पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!

Pankaja Munde : 'पर्यावरण खात्याकडे निधीची कमतरता', पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची खंत

Eknath Shinde : “भगवा दहशतवादाचा आरोप म्हणजे ...”, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संतप्त आरोप