Dinvishesh 20 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 20 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन
२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
१९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.
१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.
१९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९४५: मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.
१९४२: दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
आज यांचा जन्म
१९४५: शिवकांत तिवारी - भारतीय सिंगापुरियन राजकारणी (निधन: २६ जुलै २०१०)
१९४०: यामिनी कृष्णमूर्ती - भारतीय भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९१९: खालिद चौधरी - भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर (निधन: ३० एप्रिल २०१४)
१९०९: वक्कम मजीद - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: १० जुलै २०००)
आज यांची पुण्यतिथी
२०१०: नलिनी जयवंत - अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
२०१०: सुभाष भेंडे - भारतीय लेखक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)
१९९६: दया पवार - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
१९९३: वामन भट - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
१९५६: संत गाडगे महाराज - भारतीय संत (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६)
१९३३: विष्णू वामन बापट - संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक (जन्म: २२ मे १८७१)
१९१५: उपेंद्रकिशोर रे - भारतीय चित्रकार आणि संगीतकार (जन्म: १२ मे १८६३)
१७३१: छत्रसाल बुंदेला - बुंदेलखंडचे महाराजा (जन्म: ४ मे १६४९)