आज हनुमान जयंती. मारुती, बजरंगबली, संकटमोचक (hanuman )अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवाचा जन्म नेमका कुठे झाला. काही दिवसांपुर्वी तिरुमला तिरुपती देवस्थाननं हनुमाचा जन्म आपल्याकडे झाल्याचा दावा केला. पण या दाव्याला कर्नाटकातल्या धार्मिक संस्थांनी विरोध केला. त्यांनी हनुमानाच जन्म कर्नाटकातल्या हंपीजवळ झाला, असा त्यांनी दावा केला. दुसरीकडे नाशिकजवळील (nashik)अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा महाराष्ट्रात केला जातो.
कर्नाटकचा दावा आहे की हम्पीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेले अनेगुंडी हे गाव किष्किंदा शहर आहे. या ठिकाणी पवनपुत्राचा जन्म झाला. तर आंध्र प्रदेशचे तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) सांगत आहे की, हनुमानजींचा जन्म तिरुमालाच्या ७ टेकड्यांपैकी एका डोंगरावर झाला होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी टीटीडीने तिरुमला येथील अंजनेया टेकडीवर भूमिपूजनही केले होते, परंतु कर्नाटकातील श्री हनुमान जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे गोविंदानंद सरस्वती यांनी या बांधकामाला न्यायालयात आव्हान दिले आणि न्यायालयाने स्थगिती दिली. 2020 मध्ये, TTD ने 7 सदस्यांची एक समिती स्थापन केली होती, ज्याने हनुमानजींचे जन्मस्थान तिरुमाला असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. समितीने तयार केलेला अहवाल तेलगू भाषेत आला आहे, आता त्याची हिंदी आवृत्तीही २१ एप्रिलला लाँच होणार आहे.
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांना वाटतं. अंजनेरी हे नाशिकपासून २८ किमीवर आहे. हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते, हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे. या ठिकाणावरुन सीता मातेचे रावणाने अपहरण केले होते. सीता नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. इथेच काळाराम मंदिर आहे, सीतागुंफा आहे, आणि जटायू-रामाची भेट झाली ते टाकेद क्षेत्रही इथेच आहे. इतकंच नाही तर लक्ष्मणाने शुर्पणखेचं नाक इथेच कापलं म्हणून या गावाला 'नासिक' असं नाव पडलं ज्यांचं पुढे 'नाशिक' झालं असाही इथे प्रवाद आहे.
या ठिकाणी हनुमानाचा जन्माचा दावा
गुजरातच्या डांग जिल्ह्याबद्दल असे मानले जाते की हनुमानजींचा जन्म अंजनी पर्वताच्या गुहेत झाला होता.
झारखंडमधील गुमला येथून अंजन गाव 20 किमी अंतरावर आहे. असे मानले जाते की हनुमानाचा जन्म येथे डोंगराच्या शिखरावर असलेल्या गुहेत झाला होता.
हरियाणातील कैथल हे वानरराज हनुमानाचे जन्मस्थानही मानले जाते.
कर्नाटकातील शिवमोगा मठाने कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला आहे.
पण हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला, याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही. भाविकांची श्रद्धाच महत्वाची असल्याचे इतिहासकार सांगतात.