पेट्रोलच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशाची अर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलने १०२ रूपये प्रति लिटर इतकी उच्चांक किंमत गाठली असून डिझेल ९४ रूपये लिटरवर पोहचले आहे. तर देशात १३५ जिल्हात पेट्रोलने शंभरी गाठली आहे.
यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील वर्षभरात पेट्रोलच्या किमतीत १४ टक्क्यांनी वाढ झाली. तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाच राज्यांची निवडणुक असल्याने याकाळात पेट्रोलच्या किंमती स्थिर होत्या. आज पेट्रोल २५ – २९ पैशांनी महागले आहे तर डिझेलच्या किमतीत २७ – ३० पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.85 रुपये आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 95.80 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 97.19 रुपयांना विकले जात आहे.