क्रीडा

T20 World Cup | भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार

Published by : Lokshahi News

कोरोनामुळे आयपीएलसह क्रिकेट सर्वच मालिकांवर पाणी फिरेल. काही एखाद दुसरे सामने पार पडले असतील. त्यातच भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्यांचे सामने देखील झाले नाही. त्यामुळे चाहतावर्ग फार सुखावला आहे. या चाहत्य वर्गासाठीच ही बातमी महत्वाची आहे.

आयसीसीने आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. कोरोनामुळे टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत.

विशेष म्हणजे २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे इतक्या वेळानंतर आता होणाऱ्या सामन्यांसाठी चाहते उत्सुक आहेत.

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."

"भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला बंद केलं असतं, तर..."; शिवाजी पार्कमध्ये PM नरेंद्र मोदींनी केला मोठा खुलासा

"शिवसेनाप्रमुखांची डरकाळी शिवाजी पार्कमध्ये घुमायची, पण आज उबाठाने..." CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Daily Horoscope 18 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे दारिद्र्य दूर होऊन येतील चांगले दिवस; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 18 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना