Team India Womens vs South Africa Womens 
क्रीडा

IND W vs SA W: १२२ धावांवर आफ्रिकेचा संघ गारद! मालिका विजयाच्या 'आशा' उंचावल्या; शोभनाच्या ४ विकेट्सच्या जोरावर भारताचा रोमहर्षक विजय

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा १४३ धावांनी दारुण पराभव केला.

Published by : Naresh Shende

Team India Womens vs South Africa Womens ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका भारतात सुरु आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा १४३ धावांनी दारुण पराभव केला. भारताने निर्धारीत ५० षटकांमध्ये आफ्रिकेला २६६ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ ३७.४ षटकात १२२ धावांवर गारद झाला. भारताची युवा गोलंदाज आशा शोभनाने ४ विकेट्स घेतल्या, तर स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ११७ धावांची शतकी खेळी करुन या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने १, पुजा वस्त्रकर १, दिप्ती शर्मा २, राधा यादव १, आशा शोभनाने ४ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. भारताने तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत पहिल्याच सामन्या विजय मिळवून ०-१ ने आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधात स्मृती मंधानाने १२७ चेंडूत ११७ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मंधाना ५९ धावांवर असताना तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण झाल्या. भारताची माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार मिताली राजनंतर हा कारनामा करणारी स्मृती मंधाना भारताची दुसरी महिला फलंदाज ठरली आहे. मितालीने तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना..

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार